जयंत पाटील चौकशीसाठी ईडीच्या समोर; नेमकं प्रकरण काय?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाकडून नोटीस आली आहे.

जयंत पाटील चौकशीसाठी ईडीच्या समोर; नेमकं प्रकरण काय?
टीम तालुका न्यूज  / 22-May-2023


राज्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांचे सरकार आल्यापासून विरोधी पक्षातील नेत्यांवर पुन्हा एकदा केंद्रीय तपास यंत्रणा मागे लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाकडून नोटीस आली आहे. आज सोमवारी 22 मे ला ते ईडी चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले. 


या चौकशीला जाण्याअगोदर जयंत पाटील यांनी ट्विट करत माहिती दिली होती. यामध्ये ते म्हणाले होते की, ‘आज सकाळी ११ वाजता मी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार आहे. ईडीचे समन्स आल्यापासून मला राज्यभरातून माझ्या पक्षातील व इतर मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांचे फोन येत असून राज्यभरातून लोक आज ईडी कार्यालयाबाहेर येत असल्याचे मला समजत आहे.’


त्याचबरोबर त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मुंबईत न येण्याचं आवाहन देखील केलं आहे. ते म्हणाले, ‘माझी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती आहे की, कोणीही मुंबईला येऊ नये. मी या चौकशी कामी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असून आपण सर्वांनी माझ्याप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी आपला आभारी आहे.’असं पाटील म्हणाले.


जयंत पाटील यांनी कार्यकर्त्याना मुंबईमध्ये येण्यास मनाई केल्यांनतरदेखील अनेक कार्यकर्ते मुंबईमध्ये आले आहेत. या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर या ईडी चौकशी विरोधात ठिय्या आंदोलन सुरू केले.

जयंत पाटील यांची ईडीने चौकशी केली ते प्रकरण नेमकं काय?


इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (IL&FS) कंपनीमध्ये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जयंत पाटील यांची चौकशी होत आहे. आयएल आणि एफएलएस ही एक फायनान्स कंपनी आहे. ही कंपनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकाआणि विमा कंपन्यांनी तयार केली आहे. गेल्या काही काळापूर्वी या कंपनीच्या व्यवहारांमध्ये अनियमितता असल्याने तिची चौकशी सुरू झाली होती. या कंपनीने मनी लॉंड्रींग केल्याचा आरोप देखील करण्यात आला होता.


याच दरम्यान 2019 मध्ये या कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली. तर पोलिसांनी या कंपनीवर मनी लॉंड्रींगचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणामध्ये अरुणकुमार साहा यांची चौकशी करण्यात आली होती. यामध्ये नंतर अनेक नावं समोर आली त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखल समावेश होता. तर याच आयएल आणि एफएलएसने एका कंपनीला कर्ज दिलं होतं. या कंपनीचं कनेक्शन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांशी असल्याचं बोललं जात आहे.


लोकप्रिय पोस्ट

https://taluka.news/upload/Add_a_heading.jpg
Video : सचिन राज्याचा 'स्माइल ॲम्बेसेडर'; फडणवीस स्टेजवर असताना सरकारबद्दल म्हणाला...
टीम तालुका न्यूज  / 30-May-2023
https://taluka.news/upload/Jaynat_Patil_NCP.jpg
जयंत पाटील चौकशीसाठी ईडीच्या समोर; नेमकं प्रकरण काय?
टीम तालुका न्यूज  / 22-May-2023
https://taluka.news/upload/Mobile_phon.png
चोरीला गेलेला मोबाईल लगेच सापडणार, सरकार आणतेय नवी ट्रॅकिंग सिस्टीम
टीम तालुका न्यूज  / 15-May-2023
https://taluka.news/upload/download-1.jpg
कर्नाटकात काँग्रेसला "जनादेश" भाजपकडून दक्षिणेतील एकमेव राज्यातीलही सत्ता गेली
टीम तालुका न्यूज  / 13-May-2023
https://taluka.news/upload/Shahajibapu_Patil.png
"राऊतांना गुवाहाटीच्या झाडीत नेऊन टाका, तरचं..." शहाजीबापूंचा उपरोधिक सल्ला
टीम तालुका न्यूज  / 12-May-2023
https://taluka.news/upload/eknath_shinde.jpg
विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला चपराक, न्यायालयाच्या निकालावर एकनाथ शिंदे म्हणतात...
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/Devendra_Fadnvis_eknath_shinde.jpg
तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती? सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/weather_update.jpg
पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ, राज्यावर काय परिणाम होणार?
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/shahajibapu_patil.jpg
"ज्याचं मीठ खायचं त्याच्याशी गद्दारीची शहाजी बापूंची परंपरा..." नाना पटोलेंच्या टीकेवर काँग्रेसकडून उत्तर
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/maharashtra_police.jpg
सोलापुरात सराईत गुन्हेगाराला अटक, 15 दुचाकी, 10 मोबाईल जप्त 
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023

संबंधित पोस्ट