नागरिकांना न्याय देण्याच्या दृष्टीने संसदीय आयुधांचा योग्य वापर करावा - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींनी अधिवेशनात विविध संसदीय आयुधांचा वापर करावा. जेणेकरून नागरिकांना न्याय देण्यास सहकार्य लाभेल आणि समाजकारण व राजकारणास वळण देता येईल, असे प्रतिपादन उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनी केले.

नागरिकांना न्याय देण्याच्या दृष्टीने संसदीय आयुधांचा योग्य वापर करावा -  उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
टीम तालुका न्यूज  / 26-Apr-2023


मुंबई दि.२५: नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींनी अधिवेशनात विविध संसदीय आयुधांचा वापर करावा. जेणेकरून नागरिकांना न्याय देण्यास सहकार्य लाभेल आणि समाजकारण व राजकारणास वळण देता येईल, असे प्रतिपादन उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनी केले.


आज विधीमंडळात विविध संसदीय आयुधे, समिती पद्‌धत, विधेयके या विषयांवर विधानपरिषद सदस्यांसाठी कृतीसत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे बोलत होत्या. या कृतीसत्रात विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर, विरोधी पक्ष नेते श्री. अंबादास दानवे, सन्माननीय आमदार सर्वश्री ॲड. अनिल परब, विक्रम काळे, विलास पोतनीस, किरण सरनाईक, सुधाकर आडबाले, अरुण लाड, ज्ञानेश्वर म्हात्रे, वजहात मिर्झा, अभिजित वंजारी, आमशा पाडवी, धीरज लिंगाडे, श्रीमती. उमा खापरे, ॲड. मनिषा कायंदे,  विधीमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, सहसचिव श्री. शिवदर्शन साठे, उपसचिव श्री. ऋतुराज कुडतरकर हे उपस्थित होते.


या कृतीसत्रात महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय सेवानिवृत्त प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय सेवानिवृत्त सहसचिव डॉ. विलास आठवले, महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय सेवानिवृत्त प्रधान सचिव विलास पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.


कृतीसत्राच्या उद्घाटनाप्रसंगी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, प्रशिक्षणात प्राविण्याच्या उद्दीष्टासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार लोकांचे प्रतिनिधीत्व उत्तम प्रकारे करत असतात तेव्हाच नागरिक त्यांना निवडूण देतात. विधानपरिषदेत आपले वास्तव महत्वाचे असून, नागरिकांच्या समस्या अधिवेशनादरम्यान योग्यरित्या मांडणे गरजेचे आहे. जेणेकरून त्याची नोंद समाजातही घेतली जाईल. समाजात घडणाऱ्या अनुचित अथवा अन्यायकारक घटनांची दखल घेऊन प्रश्नोत्तरे, लक्षवेधी, अर्धातास चर्चा, अल्पसूचना, भाषण अशा विविध आयुधांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधून संबंधित घटनेला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात येऊ शकत असल्याचे मत डॉ. गोऱ्हे यांनी मांडले.
धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी समाजाने पुढाकार घेतला पाहिजे यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. तसेच कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत काय झाले आणि काय कामकाज होणार आहे याबाबतची माहिती सदस्यांना दिली जाईल, जेणेकरून सदस्यांना त्यामध्ये असलेले मुद्दे माहीत होतील आणि त्या अनुषंगाने चर्चा करता येईल. यासोबतच विधेयके कशी वाचली पाहिजेत यासंदर्भात डॉ. गोऱ्हे यांनी माहिती दिली.


यावेळी विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर यांनी म्हटले की, डॉ. गोऱ्हे यांचा विधिमंडळ सदस्यांना सातत्याने अद्ययावत करण्याचा नेहमीच प्रयत्न असतो. या स्तुत्य उपक्रमाच्या आयोजनाबद्दल त्यांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे अभिनंदन केले. विधिमंडळाच्या कामकाजासंदर्भातील पुस्तक सर्वांनी वाचले पाहिजे. विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर अधिवेशन कामकाज करताना विधिमंडळ कामकाज नियमावली पुस्तकाचा उपयोग झाला असल्याचे त्यांनी सांगितले.


लोकप्रिय पोस्ट

https://taluka.news/upload/Add_a_heading.jpg
Video : सचिन राज्याचा 'स्माइल ॲम्बेसेडर'; फडणवीस स्टेजवर असताना सरकारबद्दल म्हणाला...
टीम तालुका न्यूज  / 30-May-2023
https://taluka.news/upload/Jaynat_Patil_NCP.jpg
जयंत पाटील चौकशीसाठी ईडीच्या समोर; नेमकं प्रकरण काय?
टीम तालुका न्यूज  / 22-May-2023
https://taluka.news/upload/Mobile_phon.png
चोरीला गेलेला मोबाईल लगेच सापडणार, सरकार आणतेय नवी ट्रॅकिंग सिस्टीम
टीम तालुका न्यूज  / 15-May-2023
https://taluka.news/upload/download-1.jpg
कर्नाटकात काँग्रेसला "जनादेश" भाजपकडून दक्षिणेतील एकमेव राज्यातीलही सत्ता गेली
टीम तालुका न्यूज  / 13-May-2023
https://taluka.news/upload/Shahajibapu_Patil.png
"राऊतांना गुवाहाटीच्या झाडीत नेऊन टाका, तरचं..." शहाजीबापूंचा उपरोधिक सल्ला
टीम तालुका न्यूज  / 12-May-2023
https://taluka.news/upload/eknath_shinde.jpg
विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला चपराक, न्यायालयाच्या निकालावर एकनाथ शिंदे म्हणतात...
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/Devendra_Fadnvis_eknath_shinde.jpg
तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती? सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/weather_update.jpg
पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ, राज्यावर काय परिणाम होणार?
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/shahajibapu_patil.jpg
"ज्याचं मीठ खायचं त्याच्याशी गद्दारीची शहाजी बापूंची परंपरा..." नाना पटोलेंच्या टीकेवर काँग्रेसकडून उत्तर
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/maharashtra_police.jpg
सोलापुरात सराईत गुन्हेगाराला अटक, 15 दुचाकी, 10 मोबाईल जप्त 
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023

संबंधित पोस्ट