"ज्याचं मीठ खायचं त्याच्याशी गद्दारीची शहाजी बापूंची परंपरा..." नाना पटोलेंच्या टीकेवर काँग्रेसकडून उत्तर

काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगोला (Sangola) दौऱ्यावर असताना शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांच्यावर टीका केली होती. त्याला शहाजीबापू पाटील यांनी देखील लगेच उत्तर दिल. पण त्यामुळे आता काँग्रेस विरुद्ध शहाजीबापू पाटील असा टीका टिप्पणीचा सामना सुरु झाला आहे.

टीम तालुका न्यूज  / 09-May-2023


ज्याला खालचं वरचं कळत नाही त्याला कारभारी केलंय. काँग्रेसकडे दुसरं कोणी नाही म्हणूनच नाना पटोले यांना अध्यक्ष केलं असून राजकारणामध्ये सक्रिय नेत्यांपैकी सर्वात कमी बुद्धी असेलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, अशी खरमरीत टीका करत सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी नाना पटोले यांना उत्तर दिलं आहे. 


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल सांगोला दौऱ्यावर असताना शहाजीबापू पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता त्यांनी उत्तर दिल आहे. उत्तर देताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जळजळीत टीका केली होती. त्याला आता काँग्रेसकडून उत्तर देण्यात येत आहे.


काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी शहाजी पाटलांना प्रत्युत्तर देत म्हटले की, "मुळात शहाजी बापू पाटलांची नाना पटोले यांच्यावर बोलण्याची लायकी नाही, 'ज्याचं खावं मीठ, त्याला घोडा लावावा नीट' ही म्हण त्यांना तंतोतंत लागू होते. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून येत आमदार झालेले आज काँग्रेसच्या नेतृत्वावर टिका करत आहेत. ज्या शिवसेनेनी त्यांना तिकीट देत आमदार केल, त्या उद्धव ठाकरेंवर ही हे टिका करतात.


ते पुढे म्हणाले की, ज्याचं मीठ खायचं त्याच्याशी गद्दारी करण्याची शहाजी बापू पाटलांची परंपरा जुनी आहे आणि ते पुढे पाळत आहेत. तसेच शहाजी बापू पाटलांची अवस्था तमाशामधील तुणतुण्यासारखी झाली आहे. या सरकारमधील ते तुणतुणे आहेत, असे म्हणत काकासाहेब कुलकर्णी यांनी शहाजी पाटलांवर बोचरी टीका केली.

काय म्हणाले होते नाना पटोले?


सांगोल्याचे आधीचे आमदार गणपतराव देशमुख अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रश्न मांडायचे, पण सध्याचे सांगोल्याचे लोकप्रतिनिधी काय कॉमेडी करायला पाठवला आहे का? असा प्रश्न विचारात नाना पटोले यांनी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सांगोला तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने महूद येथे आयोजित घरेलू कामगार महिलांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बोलत होते. यावेळी त्यांनी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर टीका केली.


यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, सांगोल्याचे दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख या भागाचा पाणी प्रश्न अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडायचे. त्यांची भाषणे ऐकून अनेक आमदार प्रश्नांची जाण कशी असावी हे शिकले. सध्या मात्र या भागाचे लोकप्रतिनिधी तालुक्याच्या एकाही प्रश्नावर विधानसभेत कधी आवाज उठवत नाहीत. जनतेचे प्रश्न बाजूला सारून खोक्याच्या मागे धावणारे या भागाचा विकास कसा करू शकतील? असा लोकप्रतिनिधी आपण काय कॉमेडी करायला पाठवला आहे का? अशी टीका त्यांनी केली.


लोकप्रिय पोस्ट

https://taluka.news/upload/Add_a_heading.jpg
Video : सचिन राज्याचा 'स्माइल ॲम्बेसेडर'; फडणवीस स्टेजवर असताना सरकारबद्दल म्हणाला...
टीम तालुका न्यूज  / 30-May-2023
https://taluka.news/upload/Jaynat_Patil_NCP.jpg
जयंत पाटील चौकशीसाठी ईडीच्या समोर; नेमकं प्रकरण काय?
टीम तालुका न्यूज  / 22-May-2023
https://taluka.news/upload/Mobile_phon.png
चोरीला गेलेला मोबाईल लगेच सापडणार, सरकार आणतेय नवी ट्रॅकिंग सिस्टीम
टीम तालुका न्यूज  / 15-May-2023
https://taluka.news/upload/download-1.jpg
कर्नाटकात काँग्रेसला "जनादेश" भाजपकडून दक्षिणेतील एकमेव राज्यातीलही सत्ता गेली
टीम तालुका न्यूज  / 13-May-2023
https://taluka.news/upload/Shahajibapu_Patil.png
"राऊतांना गुवाहाटीच्या झाडीत नेऊन टाका, तरचं..." शहाजीबापूंचा उपरोधिक सल्ला
टीम तालुका न्यूज  / 12-May-2023
https://taluka.news/upload/eknath_shinde.jpg
विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला चपराक, न्यायालयाच्या निकालावर एकनाथ शिंदे म्हणतात...
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/Devendra_Fadnvis_eknath_shinde.jpg
तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती? सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/weather_update.jpg
पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ, राज्यावर काय परिणाम होणार?
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/shahajibapu_patil.jpg
"ज्याचं मीठ खायचं त्याच्याशी गद्दारीची शहाजी बापूंची परंपरा..." नाना पटोलेंच्या टीकेवर काँग्रेसकडून उत्तर
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/maharashtra_police.jpg
सोलापुरात सराईत गुन्हेगाराला अटक, 15 दुचाकी, 10 मोबाईल जप्त 
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023

संबंधित पोस्ट