शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२ चा निकाल; नागपूर, ठाणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला क्रमांक

राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामगिरीची तपासणी व मूल्यमापन करण्यात आले. यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकूण ५ गटातील प्रत्येकी ३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रशस्तीपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आले.

शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२ चा निकाल; नागपूर, ठाणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला क्रमांक
टीम तालुका न्यूज  / 20-Apr-2023


शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा २०२२ चा  निकाल यावेळी घोषित करण्यात आला. यामध्ये नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे सहा वेगवेगळ्या गटात विभागणी करण्यात आली असून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेस अनुक्रमे १५ कोटी, १० कोटी व ५ कोटी या प्रमाणे पारितोषिक देण्यात आले.


"अ" व" ब" वर्ग महानगरपालिका गटामध्ये नागपूर महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. "क" वर्ग महानगरपालिका गटामध्ये नवी मुंबई महानगरपालिका, कल्याण -डोंबिवली महानगरपालिका व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले. "ड" वर्ग महानगरपालिका गटामध्ये पनवेल महानगरपालिका, अमरावती महानगरपालिका व अहमदनगर महानगरपालिका यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले.


"अ" व" ब" वर्ग नगरपरिषद गटामध्ये शिरपूर-वरवाडे नगरपरिषद, उमरखेड नगरपरिषद  व हिंगोली नगरपरिषद यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले."क" वर्ग नगरपरिषद गटामध्ये  वेंगुर्ला नगरपरिषद व महाबळेश्वर नगरपरिषद यांना  अनुक्रमे प्रथम व  द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येऊन तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पवनी नगरपरिषद व सोनपेठ नगरपरिषद यांना देण्यात आले. नगरपंचायत गटामध्ये  मौदा नगरपंचायत व देवरुख नगरपंचायत यांना अनुक्रमे प्रथम व  द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येऊन तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देवळा (नाशिक) नगरपंचायत व बाभुळगाव नगरपंचायत यांना देण्यात आले.


राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामगिरीची तपासणी व मूल्यमापन करण्यात आले. यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकूण ५ गटातील प्रत्येकी ३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाना उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रशस्तीपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आले.


यामध्ये "अ", "ब" व "क" वर्ग महानगरपालिका गटामध्ये नाशिक महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका व पुणे महानगरपालिका यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी प्रशस्तीपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आले. "ड" वर्ग महानगरपालिका गटामध्ये इचलकरंजी महानगरपालिका,  मीरा-भाईंदर महानगरपालिका व कोल्हापूर महानगरपालिका यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी प्रशस्तीपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आले.


"अ" व" ब" वर्ग नगरपरिषद गटामध्ये शिरपूर-वरवाडे नगरपरिषद, हिंगोली नगरपरिषद  व बुलढाणा नगरपरिषद यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी प्रशस्तीपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आले. "क" वर्ग नगरपरिषद गटामध्ये  सोनपेठ नगरपरिषद, नळदुर्ग नगरपरिषद  व पाढंरकवडा नगरपरिषद यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी प्रशस्तीपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आले. नगरपंचायत गटामध्ये कणकवली  नगरपंचायत लोहारा नगरपंचायत, कोरची बुद्रुक नगरपंचायत व यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी प्रशस्तीपत्र देऊन गौरवान्वित करण्यात आले. नगररचना विभाग, मंत्रालयीन नगरविकास विभाग यामधील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.


स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत माहिती, शिक्षण व संवाद घटकाच्या जिंगल व फिल्मचा शुभारंभ, DAY-NULM लोगो, फिल्म, पुस्तिका व नगर विकास विभागाने राबविलेल्या विशेष कार्यक्रमांबाबत कॉफी टेबल बुकचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.  कार्यक्रमाची सुरूवात राज्यगीताने झाली. प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी प्रास्ताविक केले. नगरपालिका संचालनालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  किरण कुलकर्णी यांनी आभार मानले.
 


लोकप्रिय पोस्ट

https://taluka.news/upload/Add_a_heading.jpg
Video : सचिन राज्याचा 'स्माइल ॲम्बेसेडर'; फडणवीस स्टेजवर असताना सरकारबद्दल म्हणाला...
टीम तालुका न्यूज  / 30-May-2023
https://taluka.news/upload/Jaynat_Patil_NCP.jpg
जयंत पाटील चौकशीसाठी ईडीच्या समोर; नेमकं प्रकरण काय?
टीम तालुका न्यूज  / 22-May-2023
https://taluka.news/upload/Mobile_phon.png
चोरीला गेलेला मोबाईल लगेच सापडणार, सरकार आणतेय नवी ट्रॅकिंग सिस्टीम
टीम तालुका न्यूज  / 15-May-2023
https://taluka.news/upload/download-1.jpg
कर्नाटकात काँग्रेसला "जनादेश" भाजपकडून दक्षिणेतील एकमेव राज्यातीलही सत्ता गेली
टीम तालुका न्यूज  / 13-May-2023
https://taluka.news/upload/Shahajibapu_Patil.png
"राऊतांना गुवाहाटीच्या झाडीत नेऊन टाका, तरचं..." शहाजीबापूंचा उपरोधिक सल्ला
टीम तालुका न्यूज  / 12-May-2023
https://taluka.news/upload/eknath_shinde.jpg
विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला चपराक, न्यायालयाच्या निकालावर एकनाथ शिंदे म्हणतात...
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/Devendra_Fadnvis_eknath_shinde.jpg
तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती? सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/weather_update.jpg
पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ, राज्यावर काय परिणाम होणार?
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/shahajibapu_patil.jpg
"ज्याचं मीठ खायचं त्याच्याशी गद्दारीची शहाजी बापूंची परंपरा..." नाना पटोलेंच्या टीकेवर काँग्रेसकडून उत्तर
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/maharashtra_police.jpg
सोलापुरात सराईत गुन्हेगाराला अटक, 15 दुचाकी, 10 मोबाईल जप्त 
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023

संबंधित पोस्ट