सोलापुरात सराईत गुन्हेगाराला अटक, 15 दुचाकी, 10 मोबाईल जप्त 

मागील काही सोलापूर (Solapur) जिल्हात (Solapur district) वाढलेल्या चोरीच्या घटना आणि गुन्हेगारी प्रकरणावरून सोलापूर पोलिसांनी (Solapur Police) आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलिसांनी सराईत चोरटय़ाला अटक केली आहे.

सोलापुरात सराईत गुन्हेगाराला अटक, 15 दुचाकी, 10 मोबाईल जप्त 
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023


मागील काही सोलापूर जिल्हात वाढलेल्या चोरीच्या घटना आणि गुन्हेगारी प्रकरणावरून सोलापूर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलिसांनी सराईत चोरटय़ाला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून 15 दुचाकी, 10 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. या सराईत चोराकडून सोलापूर व पुण्यातील तब्ब्ल14 गुन्हे उघडकीस आले आहेत.


अविनाश गोपाळ आसबे असे अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे. सोलापूर शहर व परिसरात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढलेल्या असून, पोलीस तपास सुरू असताना नवी पेठ येथे संशयावरून अविनाश गोपाळ आसबे (रा. मु.पो. दहिटणे लक्ष्मीनगर) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असता त्याच्याजवळ चोरीच्या 15 दुचाकी, 10 मोबाईल आढळले.


या सराईताकडून फौजदार चावडी, विजापूर नाका, सदर बझार, जोडभावी पोलीस ठाणे, हडपसर व समर्थ पोलीस ठाणे पुणे, अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे, मोहोळ व सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यातील 14 गुन्हे उघडकीस आले असून, सुमारे सहा लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, पोलीस हवालदार दीपक डोके, चौगुले, पोलीस नाईक बाबर, बागलकोटे, पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड, बडुरे, व्हटकर, मोरे, लवटे, चव्हाण, चानकोटी, गुळवे यांनी सदरची कामगिरी केली आहे.


लोकप्रिय पोस्ट

https://taluka.news/upload/Add_a_heading.jpg
Video : सचिन राज्याचा 'स्माइल ॲम्बेसेडर'; फडणवीस स्टेजवर असताना सरकारबद्दल म्हणाला...
टीम तालुका न्यूज  / 30-May-2023
https://taluka.news/upload/Jaynat_Patil_NCP.jpg
जयंत पाटील चौकशीसाठी ईडीच्या समोर; नेमकं प्रकरण काय?
टीम तालुका न्यूज  / 22-May-2023
https://taluka.news/upload/Mobile_phon.png
चोरीला गेलेला मोबाईल लगेच सापडणार, सरकार आणतेय नवी ट्रॅकिंग सिस्टीम
टीम तालुका न्यूज  / 15-May-2023
https://taluka.news/upload/download-1.jpg
कर्नाटकात काँग्रेसला "जनादेश" भाजपकडून दक्षिणेतील एकमेव राज्यातीलही सत्ता गेली
टीम तालुका न्यूज  / 13-May-2023
https://taluka.news/upload/Shahajibapu_Patil.png
"राऊतांना गुवाहाटीच्या झाडीत नेऊन टाका, तरचं..." शहाजीबापूंचा उपरोधिक सल्ला
टीम तालुका न्यूज  / 12-May-2023
https://taluka.news/upload/eknath_shinde.jpg
विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला चपराक, न्यायालयाच्या निकालावर एकनाथ शिंदे म्हणतात...
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/Devendra_Fadnvis_eknath_shinde.jpg
तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती? सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/weather_update.jpg
पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ, राज्यावर काय परिणाम होणार?
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/shahajibapu_patil.jpg
"ज्याचं मीठ खायचं त्याच्याशी गद्दारीची शहाजी बापूंची परंपरा..." नाना पटोलेंच्या टीकेवर काँग्रेसकडून उत्तर
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/maharashtra_police.jpg
सोलापुरात सराईत गुन्हेगाराला अटक, 15 दुचाकी, 10 मोबाईल जप्त 
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023

संबंधित पोस्ट