२४ तास सेवा, विद्यावेतन मात्र १५ हजार ;इंटर्नशिप करणार्‍या निवासी डॉक्टरांची व्यथा शरद पवारांच्या दारी... 

इतर महानगरपालिका ५० हजार पगार देते मग जगातील सर्वात श्रीमंत मुंबई मनपा का देत नाही ;निवासी डॉक्टरांची खंत. बीएमसी मुंबई सीपीएस स्टुडंट असोसिएशनने आदरणीय शरद पवारांना दिले निवेदन ;शरद पवारांचा तात्काळ आयुक्तांना कॉल आणि ५० हजार विद्यावेतन मंजूर..

२४ तास सेवा, विद्यावेतन मात्र १५ हजार ;इंटर्नशिप करणार्‍या निवासी डॉक्टरांची व्यथा शरद पवारांच्या दारी... 
टीम तालुका न्यूज  / 26-Apr-2023


मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यात गेली कित्येक वर्षे इंटर्नशिप करणार्‍या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात ५० हजार रुपये वाढ व्हावी यासाठी आज बीएमसी मुंबई सीपीएस स्टुडंट असोसिएशनच्या निवासी डॉक्टरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांची भेट घेत निवेदन दिले. दरम्यान आदरणीय शरद पवारसाहेब यांनी मुंबई आयुक्त इक्बालसिंग चहल यांना कॉल करत या निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतन ५० हजार करण्याची मागणी करताच आयुक्तांनी तात्काळ ५० हजार विद्यावेतन देण्याचे जाहीर केले.


मागील दहा ते पंधरा वर्षापासून मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यात इंटर्नशिप करणार्‍या निवासी डॉक्टर विद्यार्थ्यांना फक्त पंधरा हजार एवढेच विद्यावेतन देण्यात येते. राज्यातील इतर ठिकाणी निवासी डॉक्टरांना ५० हजाराच्यावर विद्यावेतन मिळते. मागीलवर्षी मुंबई मनपा फी आकारत नव्हती मात्र यावर्षी एक लाख पंधरा हजार रुपये प्रत्येक इंटर्नशिप करणार्‍या विद्यार्थ्यांना आकारली आहे. हे निवासी डॉक्टर इतर डॉक्टरांप्रमाणे २४ तास सेवा देत आहेत.


सध्या हे विद्यार्थी जी फी भरत आहेत तीच पगाराच्या रुपात त्यांना मनपा प्रशासन परत करत आहे. म्हणजे एमबीबीएस होऊन मुंबई मनपा दवाखान्यात २४ तास फुकट काम करुन घेतले जात आहे. नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड या महानगरपालिका विद्यार्थ्यांना ५० हजार रुपये पगार देत आहे. मग जगातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिका या निवासी डॉक्टरांना इतका पगार का देत नाही असा सवालही या संघटनेने केला आहे. 


मुंबई मनपाच्या दवाखान्यात काम करणाऱ्या निवासी डॉक्टरांवर त्यांच्या घरांचीही जबाबदारी आहे. मात्र एवढ्या कमी पगारात काम करवून मुंबई मनपा अन्याय करत आहे असा आरोपही बीएमसी मुंबई सीपीएस स्टुडंट असोसिएशनने दिलेल्या निवेदनात केला आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. अनिकेत मवाळ,डॉ.रोशन गायकवाड, डॉ. आदित्य मवाळ आदी प्रतिनिधींनी शरद पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले.


लोकप्रिय पोस्ट

https://taluka.news/upload/Add_a_heading.jpg
Video : सचिन राज्याचा 'स्माइल ॲम्बेसेडर'; फडणवीस स्टेजवर असताना सरकारबद्दल म्हणाला...
टीम तालुका न्यूज  / 30-May-2023
https://taluka.news/upload/Jaynat_Patil_NCP.jpg
जयंत पाटील चौकशीसाठी ईडीच्या समोर; नेमकं प्रकरण काय?
टीम तालुका न्यूज  / 22-May-2023
https://taluka.news/upload/Mobile_phon.png
चोरीला गेलेला मोबाईल लगेच सापडणार, सरकार आणतेय नवी ट्रॅकिंग सिस्टीम
टीम तालुका न्यूज  / 15-May-2023
https://taluka.news/upload/download-1.jpg
कर्नाटकात काँग्रेसला "जनादेश" भाजपकडून दक्षिणेतील एकमेव राज्यातीलही सत्ता गेली
टीम तालुका न्यूज  / 13-May-2023
https://taluka.news/upload/Shahajibapu_Patil.png
"राऊतांना गुवाहाटीच्या झाडीत नेऊन टाका, तरचं..." शहाजीबापूंचा उपरोधिक सल्ला
टीम तालुका न्यूज  / 12-May-2023
https://taluka.news/upload/eknath_shinde.jpg
विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला चपराक, न्यायालयाच्या निकालावर एकनाथ शिंदे म्हणतात...
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/Devendra_Fadnvis_eknath_shinde.jpg
तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती? सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/weather_update.jpg
पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ, राज्यावर काय परिणाम होणार?
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/shahajibapu_patil.jpg
"ज्याचं मीठ खायचं त्याच्याशी गद्दारीची शहाजी बापूंची परंपरा..." नाना पटोलेंच्या टीकेवर काँग्रेसकडून उत्तर
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/maharashtra_police.jpg
सोलापुरात सराईत गुन्हेगाराला अटक, 15 दुचाकी, 10 मोबाईल जप्त 
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023

संबंधित पोस्ट