स्वतःला कमी लेखू नका, स्वतःच्या हिमतीवर काम करायला शिका; सुनंदाताई राजेंद्र पवार यांचे प्रतिपादन

श्रीयश एज्युकेशन फौंडेशन तर्फे 'आदर्श महिला सन्मान पुरस्कार सोहळा 2023' चे वितरण

स्वतःला कमी लेखू नका, स्वतःच्या हिमतीवर काम करायला शिका; सुनंदाताई राजेंद्र पवार यांचे प्रतिपादन
टीम तालुका न्यूज  / 18-Apr-2023


महिला एकत्रित येऊन उत्तम काम करतात याचे कौतुक मला नेहमीच असते. राजकीय व्यासपीठावर जायला मला  आवडत नाही किंतू समाजकार्याची रुची असल्यामुळे मी अश्या कार्यक्रमाला जात असते. परिवारात राजकीय क्षेत्राचा एवढा मोठा पाठिंबा असताना कधीही त्याचा उपयोग मी करून घेतला नाही आणि करून घेणार नाही. तुम्ही तुमच्या हिमतीवर सर्वकाही मिळू शकता, स्वतःला कमी लेखू नका असे प्रतिपादन भीमथडी यात्रेच्या आयोजका सुनंदाताई राजेंद्र पवार यांनी केले.


जागतिक महिला दिन, देशाचा अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून श्रीयश एज्युकेशन फौंडेशन यांच्या वतीने आणि G20, C20 यांच्या सौजन्याने सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, राजकीय आदी विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या सत्तर (७०) महिलांचा आदर्श महिला सन्मान पुरस्कार सोहळा 2023 चे वितरण सौ. सुनंदाताई राजेंद्र पवार यांच्या हस्ते करण्यात आले; या प्रसंगी त्या बोलत होत्या. रविवारी विद्यार्थी सहायक समितीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माईंड पॉवर ट्रेनर दत्ता कोहिनकर, केअर टेकर सोसायटीचे अध्यक्ष कुमार शिंदे, गुरुवर्य श्रीकांत धुमाळ गुरुजी, विद्यार्थी सहाय्यक समितीचे चंद्रकांत कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य आयोजन व्यावसायिक मार्गदर्शक श्रीकृष्ण सावंत, यांच्यासह श्रीयश एज्युकेशन फौंडेशनच्या अध्यक्षा सुप्रियाताई सावंत, उपाध्यक्ष हेमलता फडतरे, खजिनदार नीलिमा पारवडे, सचिव राजश्री शिंदे, विश्वस्त शिवानंद पडिले, दिनेश पवार व श्रीराम सावंत तसेच संस्थेचे सर्व सदस्य व मित्रपरिवार यांनी केले होते.


मार्गदर्शन करताना दत्ता कोहिनकर म्हणाले, कौतुक ही प्रत्येक माणसाची आंतरिक भूक आहे; ती जर पूर्ण करता आली तर तुम्ही सुखी- समाधानी जीवन जगू शकता. नवऱ्याने बायकोचे तर बायकोने नवऱ्याचे कौतुक केले तर घरातले वाद मिटतील. तसेच व्यवसाय करताना ग्राहकांचेही कौतुक करा त्याने ग्राहक कायम स्वरूपी तुमच्याशी जोडला जाईल आणि व्यवसायात वृद्धी होण्यास मोठी मदत होईल.


प्रास्ताविक भाषणात श्रीकृष्ण सावंत यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा दिला तर पुढील वाटचाली विषयी सूचित केले. श्रीकांत धुमाळ गुरुजी यांनी देखील कार्याचे कौतुक करून महिला भगिनींना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम सावंत यांनी तर आभार सुप्रिया सावंत यांनी मानले.


लोकप्रिय पोस्ट

https://taluka.news/upload/Add_a_heading.jpg
Video : सचिन राज्याचा 'स्माइल ॲम्बेसेडर'; फडणवीस स्टेजवर असताना सरकारबद्दल म्हणाला...
टीम तालुका न्यूज  / 30-May-2023
https://taluka.news/upload/Jaynat_Patil_NCP.jpg
जयंत पाटील चौकशीसाठी ईडीच्या समोर; नेमकं प्रकरण काय?
टीम तालुका न्यूज  / 22-May-2023
https://taluka.news/upload/Mobile_phon.png
चोरीला गेलेला मोबाईल लगेच सापडणार, सरकार आणतेय नवी ट्रॅकिंग सिस्टीम
टीम तालुका न्यूज  / 15-May-2023
https://taluka.news/upload/download-1.jpg
कर्नाटकात काँग्रेसला "जनादेश" भाजपकडून दक्षिणेतील एकमेव राज्यातीलही सत्ता गेली
टीम तालुका न्यूज  / 13-May-2023
https://taluka.news/upload/Shahajibapu_Patil.png
"राऊतांना गुवाहाटीच्या झाडीत नेऊन टाका, तरचं..." शहाजीबापूंचा उपरोधिक सल्ला
टीम तालुका न्यूज  / 12-May-2023
https://taluka.news/upload/eknath_shinde.jpg
विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला चपराक, न्यायालयाच्या निकालावर एकनाथ शिंदे म्हणतात...
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/Devendra_Fadnvis_eknath_shinde.jpg
तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती? सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/weather_update.jpg
पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ, राज्यावर काय परिणाम होणार?
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/shahajibapu_patil.jpg
"ज्याचं मीठ खायचं त्याच्याशी गद्दारीची शहाजी बापूंची परंपरा..." नाना पटोलेंच्या टीकेवर काँग्रेसकडून उत्तर
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/maharashtra_police.jpg
सोलापुरात सराईत गुन्हेगाराला अटक, 15 दुचाकी, 10 मोबाईल जप्त 
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023

संबंधित पोस्ट