बार्टीच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पीएचडी फेलोशिप योजना पूर्ववत सुरू करा - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

बार्टीच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पीएचडी फेलोशिप योजना पूर्ववत सुरू करा; माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

बार्टीच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पीएचडी फेलोशिप योजना पूर्ववत सुरू करा - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ
टीम तालुका न्यूज  / 12-Apr-2023


बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना बार्टीच्या वतीने पीएचडीसाठी देण्यात येणारी फेलोशिप बंद करण्यात आल्याने बहुजन समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षण प्राप्त करण्यापासून वंचित राहणार आहे. त्यामुळे बार्टीच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पीएचडी फेलोशिप योजना पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.


याबाबत छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टी, या संस्थेद्वारे पीएडी आणि एमफील करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली जाते. २०१३ पासून सुरु असलेली फेलोशिप सरकारने थांबविल्यामुळे विद्यार्थी तसेच बहुजन समाजात संतापाचे वातावरण आहे. राज्यसरकारने बार्टी संस्थेद्वारे संशोधनासाठी वितरीत करण्यात येणारी संशोधन फेलोशिप बंद केली आहे. इतर योजनांच्या निधीमध्ये सुद्धा कपात करण्यात आली आहे. या विरोधात संशोधक विद्यार्थी ५० दिवसांपासून आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. मात्र शासनाने याबद्दल कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे विदयार्थ्यांमध्ये असंतोष पसरला असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.


त्यांनी पुढे म्हटले आहे की,फेलोशिपसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी हे ग्रामीण आणि मूलभूत सुविधा उपलब्ध नसलेल्या भागातील असून ते प्रचंड कष्ट करुन पीएचडी शिक्षणापर्यंत पोहोचले आहे. यातील बहुतेक विद्यार्थ्यांची घरातील पहिली शिक्षण घेणारी पिढी आहे. भूमीहीन, शेतमजूर, कष्टकरी, वीटभट्टी, घरकाम करणाऱ्यांची ही मुले आज आपली गुणवत्ता सिद्ध करता आहे. पण जर फेलोशिपच बंद झाली तरी या मुलांच्या भवितव्याचं काय होणार हा मोठाच प्रश्न आहे. त्यामुळे बार्टीच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना देण्यात येणारी पीएचडी फेलोशिप योजना पूर्ववत सुरू करण्यात यावी अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.


लोकप्रिय पोस्ट

https://taluka.news/upload/Add_a_heading.jpg
Video : सचिन राज्याचा 'स्माइल ॲम्बेसेडर'; फडणवीस स्टेजवर असताना सरकारबद्दल म्हणाला...
टीम तालुका न्यूज  / 30-May-2023
https://taluka.news/upload/Jaynat_Patil_NCP.jpg
जयंत पाटील चौकशीसाठी ईडीच्या समोर; नेमकं प्रकरण काय?
टीम तालुका न्यूज  / 22-May-2023
https://taluka.news/upload/Mobile_phon.png
चोरीला गेलेला मोबाईल लगेच सापडणार, सरकार आणतेय नवी ट्रॅकिंग सिस्टीम
टीम तालुका न्यूज  / 15-May-2023
https://taluka.news/upload/download-1.jpg
कर्नाटकात काँग्रेसला "जनादेश" भाजपकडून दक्षिणेतील एकमेव राज्यातीलही सत्ता गेली
टीम तालुका न्यूज  / 13-May-2023
https://taluka.news/upload/Shahajibapu_Patil.png
"राऊतांना गुवाहाटीच्या झाडीत नेऊन टाका, तरचं..." शहाजीबापूंचा उपरोधिक सल्ला
टीम तालुका न्यूज  / 12-May-2023
https://taluka.news/upload/eknath_shinde.jpg
विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला चपराक, न्यायालयाच्या निकालावर एकनाथ शिंदे म्हणतात...
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/Devendra_Fadnvis_eknath_shinde.jpg
तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती? सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/weather_update.jpg
पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ, राज्यावर काय परिणाम होणार?
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/shahajibapu_patil.jpg
"ज्याचं मीठ खायचं त्याच्याशी गद्दारीची शहाजी बापूंची परंपरा..." नाना पटोलेंच्या टीकेवर काँग्रेसकडून उत्तर
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/maharashtra_police.jpg
सोलापुरात सराईत गुन्हेगाराला अटक, 15 दुचाकी, 10 मोबाईल जप्त 
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023

संबंधित पोस्ट