मुंबईतील १ मे रोजीच्या वज्रमूठ सभेसाठी काँग्रेसची जय्यत तयारी :- नाना पटोले

महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा राज्यभर होत असून छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथील सभेनंतर तिसरी सभा मुंबईत होत आहे.

मुंबईतील १ मे रोजीच्या वज्रमूठ सभेसाठी काँग्रेसची जय्यत तयारी :- नाना पटोले
टीम तालुका न्यूज  / 26-Apr-2023


महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा राज्यभर होत असून छत्रपती संभाजीनगर व नागपूर येथील सभेनंतर तिसरी सभा मुंबईत होत आहे. दोन्ही सभेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता आता मुंबईतील सभेच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून मुंबईतील सभेच्या तयारीचा आढावा यावेळी घेण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.


पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे छत्रपती संभाजी नगर व नागपूरच्या सभेला उपस्थित होते. अजित पवार नागपूरच्या सभेला उपस्थित राहणार नाहीत असे चित्र प्रसार माध्यमात रंगवण्यात आले होते पण वस्तुस्थिती जनतेने पाहिली आहे. मविआची वज्रमूठ सभा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांची एकत्रित सभा असून या सभेला राज्यातील तीन्ही पक्षांचे नेते उपस्थित असतात.


मुंबई येथे १ मे २०२३ रोजी होणा-या वज्रमूठ सभेच्या पूर्वतयारीसाठी टिळक भवन, दादर येथे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान व चंद्रकांत हंडोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस प्रमोद मोरे, राजेश शर्मा, प्रदेश प्रवक्ते डॉ, राजू वाघमारे यांच्यासह ठाणे शहर व ग्रामीण, भिवंडी शहर,  कल्याण शहर, उल्हासनगर शहर, वसई विरार शहर, मिरा भाईंदर शहर, नवी मुंबई शहर, पनवेल, रायगड, पालघर व मुंबई जिल्ह्यातील काँग्रेस जिल्हा प्रभारी, जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, आघाडी संघटना, विभाग व सेलचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.


लोकप्रिय पोस्ट

https://taluka.news/upload/Add_a_heading.jpg
Video : सचिन राज्याचा 'स्माइल ॲम्बेसेडर'; फडणवीस स्टेजवर असताना सरकारबद्दल म्हणाला...
टीम तालुका न्यूज  / 30-May-2023
https://taluka.news/upload/Jaynat_Patil_NCP.jpg
जयंत पाटील चौकशीसाठी ईडीच्या समोर; नेमकं प्रकरण काय?
टीम तालुका न्यूज  / 22-May-2023
https://taluka.news/upload/Mobile_phon.png
चोरीला गेलेला मोबाईल लगेच सापडणार, सरकार आणतेय नवी ट्रॅकिंग सिस्टीम
टीम तालुका न्यूज  / 15-May-2023
https://taluka.news/upload/download-1.jpg
कर्नाटकात काँग्रेसला "जनादेश" भाजपकडून दक्षिणेतील एकमेव राज्यातीलही सत्ता गेली
टीम तालुका न्यूज  / 13-May-2023
https://taluka.news/upload/Shahajibapu_Patil.png
"राऊतांना गुवाहाटीच्या झाडीत नेऊन टाका, तरचं..." शहाजीबापूंचा उपरोधिक सल्ला
टीम तालुका न्यूज  / 12-May-2023
https://taluka.news/upload/eknath_shinde.jpg
विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला चपराक, न्यायालयाच्या निकालावर एकनाथ शिंदे म्हणतात...
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/Devendra_Fadnvis_eknath_shinde.jpg
तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती? सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/weather_update.jpg
पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ, राज्यावर काय परिणाम होणार?
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/shahajibapu_patil.jpg
"ज्याचं मीठ खायचं त्याच्याशी गद्दारीची शहाजी बापूंची परंपरा..." नाना पटोलेंच्या टीकेवर काँग्रेसकडून उत्तर
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/maharashtra_police.jpg
सोलापुरात सराईत गुन्हेगाराला अटक, 15 दुचाकी, 10 मोबाईल जप्त 
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023

संबंधित पोस्ट