न्यूज एरिया इंडिया संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार राज्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यात जिल्हा निहाय सर्व्हेही करण्यात आला आहे. त्यात अनेक आमदारांना घरी बसण्याची वेळ येऊ शकते, असे सर्व्हे सांगतो.
राज्यात भाजप-सेनेची सत्ता
न्यूज एरिया इंडियाच्या सर्व्हेमध्ये भाजपला राज्यभरात 123 ते 129 जागा, शिवसेनेला 25 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 50-56 जागा, काँग्रेसला 50-53 जागा, ठाकरे गटाला 17-19 जागा आणि अन्य 12 असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सोलापूर जिल्ह्याची परिस्थिती काय?
न्यूज एरिना इंडियाच्या सर्व्हेमध्ये जिल्हा आणि मतदारसंघनिहाय देखील अंदाज सांगण्यात आले आहेत. या अंदाजानुसार सोलापूर जिल्हात भाजप पाच जागा, राष्ट्रवादी तीन जागा, काँग्रेस, ठाकरे गट आणि शेकाप प्रत्येकी एक जागा असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या सर्व्हेनुसार करमाळा, माढा, मोहोळ, राष्ट्रवादीकडे, सोलापूर शहर उत्तर, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण, पंढरपूर आणि माळशिरस भाजपाकडे, बार्शी ठाकरे गट, सोलापूर शहर दक्षिण काँग्रेस तर सांगोला शेतकरी कामगार पक्षाला मिळण्याचा अंदाज सांगितला आहे.
सांगोला विधानसभा शेकाप जिंकणार!
न्यूज एरिना इंडियाच्या सर्व्हेमध्ये जाहीर केल्यानुसार सांगोला विधानसभा मतदारसंघ हा शेकापच जिंकणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे गेली सहा दशके शेकापचा बालेकिल्ला असलेल्या सांगोला मतदारसंघावर पुन्हा एकदा शेकापचा दावा सिद्ध झाला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी ऐनवेळी जाहीर झालेल्या उमेदवारीमुळे शेकापच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला होता. पण यावेळी गणपतराव देशमुख यांचे नातू बाबासाहेब देशमुख यांनी आपला जनसंपर्क वाढवून पुन्हा एकदा शेकापचा गड जिंकण्याचा प्लॅन आखला आहे.
Pune/ Desh Region (58 seats) -
BJP : 22-23
SS : 1
NCP : 23
INC : 9-10
SSUBT : 1
OTH : 1
Kolhapur - BJP :2-3, SS : 1, NCP : 4, INC : 2-3
271. Chandgad : NCP
272. Radhanagari : NCP
273. Kagal : NCP
274. Kolhapur South : 50:50
275. Karvir : INC
276. Kolhapur North : SS
277.…
— News Arena India (@NewsArenaIndia) June 17, 2023