ज्याला खालचं वरचं कळत नाही त्याला... शहाजीबापूंच नाना पटोलेंना खरमरीत उत्तर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल सांगोला दौऱ्यावर असताना शहाजीबापू पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता त्यांनी उत्तर दिल आहे. उत्तर देताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जळजळीत टीका केली आहे.

ज्याला खालचं वरचं कळत नाही त्याला... शहाजीबापूंच नाना पटोलेंना खरमरीत उत्तर
टीम तालुका न्यूज  / 08-May-2023


ज्याला खालचं वरचं कळत नाही त्याला कारभारी केलंय. काँग्रेसकडे दुसरं कोणी नाही म्हणूनच नाना पटोले यांना अध्यक्ष केलं असून राजकारणामध्ये सक्रिय नेत्यांपैकी सर्वात कमी बुद्धी असेलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, अशी खरमरीत टीका करत सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी नाना पटोले यांना उत्तर दिलं आहे. 


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल सांगोला दौऱ्यावर असताना शहाजीबापू पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता त्यांनी उत्तर दिल आहे. उत्तर देताना आमदार शहाजीबापू पाटील यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जळजळीत टीका केली आहे.


आमदार पाटील म्हणाले, ज्याला खालचं वरचं कळत नाही त्याला कारभारी केलंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना काही कळत नाही. अकलूज, काय कुठंय ते त्यांना माहितीये का? असा सवाल उपस्थित करीत त्यांनी नाना पटोलेंवर निशाणा साधला आहे.


तसेच काँग्रेसकडे दुसरं कोणी नाही म्हणूनच नाना पटोले यांना अध्यक्ष केलं असून राजकारणामध्ये सक्रिय नेत्यांपैकी सर्वात कमी बुद्धी असेलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्याचीही जळजळीत टीका त्यांनी यावेळी केलीय. 


यावेळी बोलताना शहाजीबापूंनी नाना पटोलेंसह ठाकरे गटाचे संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधत टोलेबाजी केलीय. गेल्या चार महिन्यांपासून दररोज सकाळी संजय राऊत राज्यात स्फोट होणार असल्याचं भाकीत करीत आहेत, पण तसा काही स्फोट झाला आहे का? हेच बोलून बोलून ते बारीक झाले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते नाना पटोले?


सांगोल्याचे आधीचे आमदार गणपतराव देशमुख अभ्यासपूर्ण पद्धतीने प्रश्न मांडायचे, पण सध्याचे सांगोल्याचे लोकप्रतिनिधी काय कॉमेडी करायला पाठवला आहे का? असा प्रश्न विचारात नाना पटोले यांनी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सांगोला तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने महूद येथे आयोजित घरेलू कामगार महिलांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बोलत होते. यावेळी त्यांनी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर टीका केली.


यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, सांगोल्याचे दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख या भागाचा पाणी प्रश्न अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडायचे. त्यांची भाषणे ऐकून अनेक आमदार प्रश्नांची जाण कशी असावी हे शिकले. सध्या मात्र या भागाचे लोकप्रतिनिधी तालुक्याच्या एकाही प्रश्नावर विधानसभेत कधी आवाज उठवत नाहीत. जनतेचे प्रश्न बाजूला सारून खोक्याच्या मागे धावणारे या भागाचा विकास कसा करू शकतील? असा लोकप्रतिनिधी आपण काय कॉमेडी करायला पाठवला आहे का? अशी टीका त्यांनी केली.


लोकप्रिय पोस्ट

https://taluka.news/upload/Add_a_heading.jpg
Video : सचिन राज्याचा 'स्माइल ॲम्बेसेडर'; फडणवीस स्टेजवर असताना सरकारबद्दल म्हणाला...
टीम तालुका न्यूज  / 30-May-2023
https://taluka.news/upload/Jaynat_Patil_NCP.jpg
जयंत पाटील चौकशीसाठी ईडीच्या समोर; नेमकं प्रकरण काय?
टीम तालुका न्यूज  / 22-May-2023
https://taluka.news/upload/Mobile_phon.png
चोरीला गेलेला मोबाईल लगेच सापडणार, सरकार आणतेय नवी ट्रॅकिंग सिस्टीम
टीम तालुका न्यूज  / 15-May-2023
https://taluka.news/upload/download-1.jpg
कर्नाटकात काँग्रेसला "जनादेश" भाजपकडून दक्षिणेतील एकमेव राज्यातीलही सत्ता गेली
टीम तालुका न्यूज  / 13-May-2023
https://taluka.news/upload/Shahajibapu_Patil.png
"राऊतांना गुवाहाटीच्या झाडीत नेऊन टाका, तरचं..." शहाजीबापूंचा उपरोधिक सल्ला
टीम तालुका न्यूज  / 12-May-2023
https://taluka.news/upload/eknath_shinde.jpg
विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला चपराक, न्यायालयाच्या निकालावर एकनाथ शिंदे म्हणतात...
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/Devendra_Fadnvis_eknath_shinde.jpg
तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती? सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/weather_update.jpg
पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ, राज्यावर काय परिणाम होणार?
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/shahajibapu_patil.jpg
"ज्याचं मीठ खायचं त्याच्याशी गद्दारीची शहाजी बापूंची परंपरा..." नाना पटोलेंच्या टीकेवर काँग्रेसकडून उत्तर
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/maharashtra_police.jpg
सोलापुरात सराईत गुन्हेगाराला अटक, 15 दुचाकी, 10 मोबाईल जप्त 
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023

संबंधित पोस्ट