महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल कंपन्यांनी ग्राहकांना आनंदाची बातमी. 1 मे रोजी एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात कपात करण्यात आली असून, कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमतीतही कपात सरकारी तेल कंपन्यांनी (OMCs) केली आहे. यासोबतच जेट फ्लूटच्या किमतीतही कपात करण्यात आली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत होते. यामध्ये सर्वाधिक परिणाम व्यावसायिक गॅस सिलिंडरवर दिसून आला. अलीकडेच दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 91.50 रुपयांनी कमी झाली आहे. त्यानंतर सिलिंडर 2,028 रुपयांना मिळत होते.
मुंबई आणि चेन्नईचे दर
मुंबईबद्दल बोलायचे झाले तर आधी हा सिलेंडर 1980 रुपयांचा होता, तो आता 1808.50 रुपयांवर आला. त्याच वेळी, चेन्नईमध्ये 2192.50 रुपयांच्या सिलेंडरसाठी आता 2021.50 रुपये मोजावे लागतील.तेल विपणन कंपन्यांकडून एटीएफची किंमत 2415.25 रुपयांनी कमी करण्यात आली असून, गर्दीच्या प्रवासाच्या हंगामात किमती कमी झाल्यामुळे विमान कंपन्यांना मोठा दिलासा मिळणार
19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 171.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. या कपातीनंतर मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1960.50 रुपयांवर गेली आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात व्यावसायिक सिलिंडरच्या किमती 91.50 रुपयांनी कमी झाल्या होत्या. 1 ऑगस्ट 2022 रोजीही सिलिंडरची किंमत प्रति युनिट 36 रुपयांनी कमी झाली होती. दुसरीकडे, 6 जुलै रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात प्रति युनिट 8.5 ने कपात करण्यात आली.
ATF च्या किमती
ATF ची किंमत दिल्लीत 95935.34 रुपये प्रति किलोलीटर, मुंबईत 89348.60 रुपये प्रति किलोलीटर, कोलकातामध्ये 102596.20 रुपये आणि चेन्नईमध्ये 99828.54 रुपये प्रति किलोलीटरवर आली आहे.