हरितक्रांतीमुळं झालेले संकरीकरण शेतकऱ्यांच्या मुळावर

शेतकरी (Farmers) अनेक संकटाचा सामना करुन गुणवत्तापूर्ण भाजीपाला उत्पादन घेतो. मात्र, बाजारातील मंदीमुळं 70 टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी मागील सहा वर्षापासून तोट्याची शेती करत आहेत

हरितक्रांतीमुळं झालेले संकरीकरण शेतकऱ्यांच्या मुळावर
टीम तालुका न्यूज  / 19-Apr-2023


अलिकडील दहा वर्षापासून हरितक्रांतीमुळं झालेले संकरीकरण (Hybridization) शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचे मत कृषीभूषण अंकुश पडवळे (Ankush Padwale) यांनी व्यक्त केलं. शेतकऱ्यांना सतत मंदीला तोंड द्यावे लागत असल्याचे पडवळे म्हणाले. सांगोल्यात (sangola) आयोजीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनात 'शेतकऱ्यांचे प्रश्न आणि साहित्य' या विषयावर ते बोलत होते. शेतकरी (Farmers) अनेक संकटाचा सामना करुन गुणवत्तापूर्ण भाजीपाला उत्पादन घेतो. मात्र, बाजारातील मंदीमुळं 70 टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी मागील सहा वर्षापासून तोट्याची शेती करत आहेत. ही फार गंभीर गोष्ट असल्याचे पडवळे म्हणाले.


मागील 40-50 वर्षापूर्वी अन्न धान्याचा तुटवडा भासत असल्यानं हरितक्रांतीच्या माध्यमातून बियाण्यांचे संकरीकरण करुन सर्वच पिकांचे उत्पादन वाढवण्यात आले. त्यातून अन्न धान्याची गरज भरुन काढण्यात आली. पण त्यावेळची हरितक्रांती अलिकडील काळात शेतकऱ्यांच्या मुळावर उठल्याचे पडवळे म्हणाले. सर्वच पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले असून गरजेपेक्षा किती तरी जास्त उत्पादन होत आहे. यामुळं 70 टक्क्यांपेक्षा जास्त शेतकरी मागील सहा-सात वर्षापासून मंदीत शेती करत असल्याचे पडवळे म्हणाले. शेतकरी सर्व संकटाचा सामना करुनही चांगले उत्पादन घेत आहेत. अलिकडे शेतीतील सर्वच पिकांचा उत्पादन खर्चही वाढला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या पुढे आर्थिक मोठे संकट उभा राहत आहे. यासाठी शासनाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना तेजी मंदीतून बाहेर काढण्यासाठी पिक नोंदीची यंत्रणा उभी करण्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचे पडवळे म्हणाले.


बदलत्या हवामानामुळं शेती संकटात 


देशाला स्वातंत्र्य मिळून साठ वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊनही कृषीप्रधान देशात अद्याप शेतीमध्ये पायाभुत सुविधा उभा केल्या नाहीत. सध्या बदलत्या हवामानामुळं शेती संकटात आली आहे. त्यामुळे पुढील काळात शेती करणे आव्हानात्मक असणार आहे. शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचाही विषय अतिशय गंभीर बनला आहे. तरी शेतकऱ्यांच्या तरुण मुलांनी शेतीत नवनवीन तंत्रज्ञान आणून शेतीकडे सकारात्मक नजरेने पाहावं असे अहवानही पडवळे यांनी केलं. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष जेष्ठ कवी इंद्रजित भालेराव, परिसंवादाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. महेंद्र कदम, डॉ. कृष्णा इंगोले उपस्थित होते.   सांगोल्यात तीन दिवसीय राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात 'शेतकऱ्यांचे प्रश्न आणि साहित्य' या विषयावर परिसंवदाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी पडवळे बोलत होते.


लोकप्रिय पोस्ट

https://taluka.news/upload/Add_a_heading.jpg
Video : सचिन राज्याचा 'स्माइल ॲम्बेसेडर'; फडणवीस स्टेजवर असताना सरकारबद्दल म्हणाला...
टीम तालुका न्यूज  / 30-May-2023
https://taluka.news/upload/Jaynat_Patil_NCP.jpg
जयंत पाटील चौकशीसाठी ईडीच्या समोर; नेमकं प्रकरण काय?
टीम तालुका न्यूज  / 22-May-2023
https://taluka.news/upload/Mobile_phon.png
चोरीला गेलेला मोबाईल लगेच सापडणार, सरकार आणतेय नवी ट्रॅकिंग सिस्टीम
टीम तालुका न्यूज  / 15-May-2023
https://taluka.news/upload/download-1.jpg
कर्नाटकात काँग्रेसला "जनादेश" भाजपकडून दक्षिणेतील एकमेव राज्यातीलही सत्ता गेली
टीम तालुका न्यूज  / 13-May-2023
https://taluka.news/upload/Shahajibapu_Patil.png
"राऊतांना गुवाहाटीच्या झाडीत नेऊन टाका, तरचं..." शहाजीबापूंचा उपरोधिक सल्ला
टीम तालुका न्यूज  / 12-May-2023
https://taluka.news/upload/eknath_shinde.jpg
विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला चपराक, न्यायालयाच्या निकालावर एकनाथ शिंदे म्हणतात...
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/Devendra_Fadnvis_eknath_shinde.jpg
तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती? सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/weather_update.jpg
पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ, राज्यावर काय परिणाम होणार?
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/shahajibapu_patil.jpg
"ज्याचं मीठ खायचं त्याच्याशी गद्दारीची शहाजी बापूंची परंपरा..." नाना पटोलेंच्या टीकेवर काँग्रेसकडून उत्तर
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/maharashtra_police.jpg
सोलापुरात सराईत गुन्हेगाराला अटक, 15 दुचाकी, 10 मोबाईल जप्त 
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023

संबंधित पोस्ट