आषाढी यात्रेच्या अनुषंगाने पालखी महामार्गाची पाहणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

पायी आषाढी वारीकरीता महाराष्ट्रातून हजारो वारकरी येत असतात. या वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा देण्याचे काम प्रशासनामार्फत करण्यात येते.

आषाढी यात्रेच्या अनुषंगाने पालखी महामार्गाची पाहणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
टीम तालुका न्यूज  / 06-Apr-2023


पुणे दि.5: आषाढी यात्रेच्या अनुषंगाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर चालू असलेल्या प्रकल्पांच्या कामाची पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख  यांनी  उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.


दरवर्षी जुन महिन्यामध्ये आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त आळंदी येथून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व देहू येथून श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे होत असते. पायी आषाढी वारीकरीता महाराष्ट्रातून हजारो वारकरी येत असतात. या वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा देण्याचे काम प्रशासनामार्फत करण्यात येते. वारीचे आयोजन पावसाळ्याच्या सुरुवातीस होत असल्याने वारकऱ्यांसाठी पालखी मार्ग व पालखी तळावर आवश्यक व्यवस्था करण्याच्यादृष्टीने आतापासूनच सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना डॉ.देशमुख यांनी दिल्या आहेत.


श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या प्रकल्पाची कामे ठिकठिकाणी सुरु आहेत. हवेली, खेड, दौंड-पुरंदर, बारामती-इंदापूर या तालुक्यांच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी आषाढी यात्रा (पायी वारी) 2023 च्या अनुषंगाने आपआपल्या कार्यक्षेत्रातून जाणाऱ्या दोन्हीही पालखी मार्गाच्या पूर्ण झालेल्या आणि प्रगतीपथावर असलेल्या कामांची आळंदी व देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त व इतर सदस्य आणि तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करावी. तसेच आषाढी वारीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने बैठका घेऊन सर्व संबंधीतांना सूचना देण्यात याव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ.  देशमुख यांनी दिल्या आहेत.


लोकप्रिय पोस्ट

https://taluka.news/upload/Add_a_heading.jpg
Video : सचिन राज्याचा 'स्माइल ॲम्बेसेडर'; फडणवीस स्टेजवर असताना सरकारबद्दल म्हणाला...
टीम तालुका न्यूज  / 30-May-2023
https://taluka.news/upload/Jaynat_Patil_NCP.jpg
जयंत पाटील चौकशीसाठी ईडीच्या समोर; नेमकं प्रकरण काय?
टीम तालुका न्यूज  / 22-May-2023
https://taluka.news/upload/Mobile_phon.png
चोरीला गेलेला मोबाईल लगेच सापडणार, सरकार आणतेय नवी ट्रॅकिंग सिस्टीम
टीम तालुका न्यूज  / 15-May-2023
https://taluka.news/upload/download-1.jpg
कर्नाटकात काँग्रेसला "जनादेश" भाजपकडून दक्षिणेतील एकमेव राज्यातीलही सत्ता गेली
टीम तालुका न्यूज  / 13-May-2023
https://taluka.news/upload/Shahajibapu_Patil.png
"राऊतांना गुवाहाटीच्या झाडीत नेऊन टाका, तरचं..." शहाजीबापूंचा उपरोधिक सल्ला
टीम तालुका न्यूज  / 12-May-2023
https://taluka.news/upload/eknath_shinde.jpg
विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला चपराक, न्यायालयाच्या निकालावर एकनाथ शिंदे म्हणतात...
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/Devendra_Fadnvis_eknath_shinde.jpg
तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती? सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/weather_update.jpg
पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ, राज्यावर काय परिणाम होणार?
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/shahajibapu_patil.jpg
"ज्याचं मीठ खायचं त्याच्याशी गद्दारीची शहाजी बापूंची परंपरा..." नाना पटोलेंच्या टीकेवर काँग्रेसकडून उत्तर
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/maharashtra_police.jpg
सोलापुरात सराईत गुन्हेगाराला अटक, 15 दुचाकी, 10 मोबाईल जप्त 
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023

संबंधित पोस्ट