"दिल्लीची सत्ता, गद्दारी आणि इतिहास" ज्योतिरादित्य आणि जयराम रमेशांचा ट्विटर वाद चर्चेत

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्यात ट्विटरवर जोरदार शाब्दिक वाद पाहायला मिळाला आहे. त्यांचा वाद सुरु असतानाच त्यावर लोकांनीही विविध प्रतिक्रिया देत शाब्दिक चिमटे काढायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे मीडिया सेलचे प्रमुख असलेल्या जयराम रमेश यांनी राहुल गांधी यांच्यावर सिंधियाच्या टीकेला उत्तर दिले होते. ज्यात रमेश यांनी सिंधिया यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. त्यावरून सोशल मीडियावरच दोघांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत.

टीम तालुका न्यूज  / 06-Apr-2023


केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्यात ट्विटरवर जोरदार शाब्दिक वाद पाहायला मिळाला आहे. त्यांचा वाद सुरु असतानाच त्यावर लोकांनीही विविध प्रतिक्रिया देत शाब्दिक चिमटे काढायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे मीडिया सेलचे प्रमुख असलेल्या जयराम रमेश यांनी राहुल गांधी यांच्यावर सिंधियाच्या टीकेला उत्तर दिले होते. ज्यात रमेश यांनी सिंधिया यांच्यावर जोरदार हल्ला चढवला होता. त्यावरून सोशल मीडियावरच दोघांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत.

या पोस्टमुळे वाद सुरु झाला


या वादाची सुरुवात झाली जयराम रमेश यांच्या एका ट्विटमुळे. रमेश यांनी एक ट्विट केलं होत, त्यात त्यांनी म्हटलं होत की, "गुलाम नबी आझाद आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे दोघेही काँग्रेस व्यवस्थेचे आणि पक्ष नेतृत्वाचे प्रचंड लाभार्थी आहेत. पण आता प्रत्येक दिवसागणिक ते हे सिद्ध करतात की ते या औदार्याला पात्र नव्हते. ते त्याचे खरे पात्र दाखवत आहेत, जे त्यांनी इतके दिवस लपवून ठेवले होते."


जयराम रमेश यांच्या या ट्विटला सिंधिया यांनी लगेच उत्तर दिलं. त्यांनी त्यांच्या या ट्विटला उत्तर देताना सिंधिया म्हणाले की, "मुंह में राम बगल में छुरी! तुमच्या अशा विधानांवरून काँग्रेसमध्ये किती प्रतिष्ठा आणि विचारधारा शिल्लक आहे, हे स्पष्ट होते. तसंही तुम्ही स्वतःला समर्पित आहात; त्यामुळे तुमचे राजकारण जिवंत आहे. मी आणि माझे कुटुंब नेहमीच जनतेला उत्तरदायी आहे.

झाशीच्या राणीशी शिंदेंची गद्दारी


दरम्यान जयराम रमेश यांनी आणखी एक ट्विट केलं. त्यावर मोठी चर्चा झाली. रमेश यांनी एक ट्विट केले होते की, ते (ज्योतिरादित्य सिंधिया) सुभद्रा कुमारी चौहान यांची झाशीच्या राणीवरील अजरामर कविता विसरले आहेत का?


यावेळी त्यांनी ती कविताही ट्विट केली होती. "अंग्रेज़ों के मित्र सिंधिया ने छोड़ी राजधानी थी, बुंदेले हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झाँसी वाली रानी थी" हि कविता त्यांनी ट्विट केली


जयराम रमेश यांच्या या ट्विटवर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या ग्लिपसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या पुस्तकाचा संदर्भ देत, "कविता कमी आणि इतिहास जास्त वाचा." अशी टीका केली.


पंडित नेहरू यांच्या "ग्लिपसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री" पुस्तकातील उताऱ्यानुसार, "अशा प्रकारे त्यांनी (मराठ्यांनी) दिल्ली जिंकली. मराठे ब्रिटिश वर्चस्वाला आव्हान देत राहिले. पण ग्वाल्हेरच्या महादजी सिंधिया यांच्या मृत्यूनंतर मराठा सत्तेचे विघटन झाले." हा संदर्भ सिंधिया यांनी दिला.

सावरकरांचा संदर्भ देत जयराम रमेश यांचे उत्तर


सिंधिया यांनी दिलेल्या उत्तरावर जयराम रमेश यांनीही त्यांना पुन्हा प्रत्युत्तर दिले. त्यात त्यांनी म्हटले की, "इतिहासाचे कोणतेही पुस्तक घ्या. १८५७ मध्ये झाशीच्या राणीशी झालेल्या विश्वासघाताच्या मुद्द्यावर सर्व इतिहासकारांचे एकमत आहे. तुमचा नवे भगवान सावरकर यांनीही राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे आणि इतरांसोबत सिंधियाच्या विश्वासघाताचा उल्लेख त्यांच्या '१८५७ चे स्वातंत्रसमर' या पुस्तकात केला आहे. तुम्हीही इतिहास वाचा." असा टोला रमेश यांनी सिंधिया यांना लगावला.

मराठे आजही एक आहेत


जयराम रमेश यांनी केलेल्या विश्वास घाताच्या टिकेकर सिंधिया यांनी पुन्हा उत्तर दिले. त्यात त्यांनी म्हटले की, "१८५७ चे शूर शहीद तात्या टोपे यांचे वंशज पराग टोपे यांनी लिहिलेले 'ऑपरेशन रेड लोटस' हे पुस्तक कधीतर वाचा. इंग्रजांच्या विरोधात आम्ही मराठे - सिंधिया, पेशवे आणि झाशीचे नेवाळकर कसे एकत्र होतो, ते कळेल."


याच ट्विटमध्ये सिंधिया पुढे म्हणाले की, "मराठा अजूनही एक आहेत. त्यामुळे हे विभाजनाचे राजकारण थांबवा." असा सल्ला देखील त्यांनी रमेश यांना दिला.


ज्योतिरादित्य सिंधिया आणि जयराम रमेश यांच्यातील या ट्विटरवर वादाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. एकेकाळी हे दोन्ही नेते काँग्रेसमध्ये सोबत होते, पण सिंधिया यांनी काँग्रेसला राम राम करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ते सध्या आपल्या जुन्या पक्षावर जोरदार टीका करताना दिसत आहेत.


जयराम रमेश यांना मीडिया सेलची जबाबदारी दिली आहे, त्यामुळे काँग्रेस नेत्यांवर केलेल्या टीकेला ते आक्रमकपणे उत्तर देताना दिसतात. त्यात राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यास ते लगेच त्याला उत्तर देताना दिसतात. त्यातून ट्विटरवर ज्योतिरादित्य सिंधिया आणि जयराम रमेश हा वाद सुरु झाल्याचे पाहायला मिळालं आहे. सध्या तरी त्याच्या एकमेकांवरच्या टीकेचा हा थ्रेड बराच मोठा झाला आहे. त्यात अजून किती वाढ होणार, हे देखील पाहायला मिळेल.

लोकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया


ज्योतिरादित्य सिंधिया आणि जयराम रमेश यांच्यातील वाद ट्विटरवर सुरु झाला पण त्यावर सामान्य लोकांकडून देखील त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहे. काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षातील समर्थक एकमेकांना उत्तर देताना दिसत आहे.


अशीच एक प्रतिक्रिया राज मीना बस्सी यांनी दिली आहे. रमेश यांना उत्तर देताना त्यांनी म्हटले की, "देशाचा इतिहास काहीही असो, पण तुमचा इतिहास चमच्याचाच राहील."


याशिवाय आणखी एका युअरने लिहले आहे की, "सिंधिया जी, तुम्ही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, काँग्रेसने या प्रकरणी तुमचा अनेकदा बचाव केला होता, पण भाजपचा एकही नेता तुमच्या मदतीला आला नाही."


लोकप्रिय पोस्ट

https://taluka.news/upload/Add_a_heading.jpg
Video : सचिन राज्याचा 'स्माइल ॲम्बेसेडर'; फडणवीस स्टेजवर असताना सरकारबद्दल म्हणाला...
टीम तालुका न्यूज  / 30-May-2023
https://taluka.news/upload/Jaynat_Patil_NCP.jpg
जयंत पाटील चौकशीसाठी ईडीच्या समोर; नेमकं प्रकरण काय?
टीम तालुका न्यूज  / 22-May-2023
https://taluka.news/upload/Mobile_phon.png
चोरीला गेलेला मोबाईल लगेच सापडणार, सरकार आणतेय नवी ट्रॅकिंग सिस्टीम
टीम तालुका न्यूज  / 15-May-2023
https://taluka.news/upload/download-1.jpg
कर्नाटकात काँग्रेसला "जनादेश" भाजपकडून दक्षिणेतील एकमेव राज्यातीलही सत्ता गेली
टीम तालुका न्यूज  / 13-May-2023
https://taluka.news/upload/Shahajibapu_Patil.png
"राऊतांना गुवाहाटीच्या झाडीत नेऊन टाका, तरचं..." शहाजीबापूंचा उपरोधिक सल्ला
टीम तालुका न्यूज  / 12-May-2023
https://taluka.news/upload/eknath_shinde.jpg
विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला चपराक, न्यायालयाच्या निकालावर एकनाथ शिंदे म्हणतात...
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/Devendra_Fadnvis_eknath_shinde.jpg
तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती? सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/weather_update.jpg
पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ, राज्यावर काय परिणाम होणार?
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/shahajibapu_patil.jpg
"ज्याचं मीठ खायचं त्याच्याशी गद्दारीची शहाजी बापूंची परंपरा..." नाना पटोलेंच्या टीकेवर काँग्रेसकडून उत्तर
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/maharashtra_police.jpg
सोलापुरात सराईत गुन्हेगाराला अटक, 15 दुचाकी, 10 मोबाईल जप्त 
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023

संबंधित पोस्ट