डीके शिवकुमार : देवेगौडा पिता-पुत्रांचा पराभव ते अमित शाह यांना टक्कर; कर्नाटकच्या काँग्रेस विजयामागचा चाणक्य

कर्नाटकात काँग्रेस विजयाकडे वाटचाल करत असताना काँग्रेसच्या विजयामागे एका नावाची जोरदार चर्चा आहे. ते नाव म्हणजे डी. के. शिवकुमार.

डीके शिवकुमार : देवेगौडा पिता-पुत्रांचा पराभव ते अमित शाह यांना टक्कर; कर्नाटकच्या काँग्रेस विजयामागचा चाणक्य
टीम तालुका न्यूज  / 17-May-2023


दक्षिणेतील राज्यात फार यश न मिळालेल्या भाजपला एकमेव राज्यातील सत्ताही गमवावी लागली आहे. कर्नाटकात भाजपला सत्तेतून पायउतार व्हावं लागल आहे. कर्नाटकने सत्तेसाठी काँग्रेसला जनादेश दिला असून, स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे.


निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दुपारी दीड वाजेपर्यंत काँग्रेसने 6 जागांवर विजय मिळवला असून, 127 जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपने 3 जागा जिंकल्या असून, 62 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला एकूण 133 जागा मिळताना दिसत असून, भाजपला 65 जागा मिळू शकतात. जेडीएस 22 जागांवर आघाडीवर आहे.

कर्नाटकात काँग्रेस विजयाकडे वाटचाल करत असताना काँग्रेसच्या विजयामागे एका नावाची जोरदार चर्चा आहे. ते नाव म्हणजे डी. के. शिवकुमार.


सध्या कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या डी. के. शिवकुमार यांची गेल्या काही वर्षांपासून देशभर चर्चा होत असते. त्याची कारणेही तशीच आहेत. पण त्याआधी देखील त्यांची राजकीय कारकीर्द देखील अशीच आक्रमक आहे. ते देखील पाहायला हवी.


आपल्या राजकीय जीवनात डीके शिवकुमार यांनी आजवर अनेक दिग्गज नेत्यांना पराभव दाखवला आहे. 1990 च्या विधानसभा निवडणुकीत डीके शिवकुमार यांना काँग्रेसकडून तिकीट नाकारण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीत त्यांनी माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा पराभव केला होता.


यानंतर बरोबर 10 वर्षांनी म्हणजे 2000 साली डीके शिवकुमार यांनी देवेगौडा यांचा मुलगा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनाही पराभव पाहायला लावला होता. या मोठ्या विजयांमुळे म्हटले गेले होते की कर्नाटकात एक मोठा नेता उदयास आला आहे, जो महत्वाकांक्षी देखील आहे आणि प्रत्येक कठीण परिस्थितीला चांगले कसे सामोरे जावे हे जाणतो.


त्यांच्या राजकीय अनुभवाचा पहिला मोठा पुरावा 2004 च्या लोकसभा निवडणुकीतही पाहायला मिळाला. त्या निवडणुकीत डीके यांना कनकपुरा लोकसभा मतदारसंघातून नवख्या अशा तेजस्विनी यांना लोकसभेचे तिकीट दिले. तेजस्विनी यांची थेट माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्याशी लढत झाली. नवख्या तेजस्विनीने देवेगौडांचा पराभव करून निवडणूक जिंकली, पण याचं सगळं नियोजन हे डीके शिवकुमार यांनी केलं होत.


डीके शिवकुमार यांच्याबद्दल आता आणखी एक गोष्ट सांगितली जाते, ते काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यांची वैयक्तिक नाराजी कुणाशीही राहू शकते, पण राजकारण समजून घेऊन त्यांनी अनेक मोठी पावले उचलली आहेत. असेच एक पाऊल 2018 च्या विधानसभा निवडणुकीनंतरही पाहायला मिळाले. 2018 मध्ये कर्नाटकात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही, त्यानंतर काँग्रेसने जेडीएससोबत हातमिळवणी केली आणि राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. तेव्हा डीके यांनी हा करार पूर्ण करण्यात सक्रिय भूमिका बजावली होती.


डीके शिवकुमार यांनी याआधीही आपल्या राजकीय अनुभवाचा पुरावा दिला होता. 2017 मध्ये जेव्हा गुजरात राज्यसभेच्या निवडणुका होणार होत्या, तेव्हा डीके यांना पक्षातील काही नेते भाजपमध्ये सामील होण्याची भीती होती. भाजपने त्या नेत्यांना पक्षात आणण्याचा प्रयत्न केला असण्याचीही शक्यता होती. अशा परिस्थितीत गुजरातमधील काँग्रेस नेत्यांना काही काळासाठी बंगळुरू येथील त्यांच्या रिसॉर्टमध्ये पाठवण्याचे आवाहन त्यावेळी डीके यांनी काँग्रेस हायकमांडला केले होते.


आता त्यांच्या राजकीय चालींमुळे डीके शिवकुमार काँग्रेससाठी नेहमीच उपयुक्त ठरले आहेत. पण त्यांच्यावर वेळोवेळी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोपही झाले आहेत. त्यांना ईडीने 3 सप्टेंबर 2019 रोजी मनी लाँड्रिंग आणि करचुकवेगिरीशी संबंधित प्रकरणात अटक केली होती. पण त्याहीवेळी ते त्याला सामोरे गेले. 


लोकप्रिय पोस्ट

https://taluka.news/upload/Add_a_heading.jpg
Video : सचिन राज्याचा 'स्माइल ॲम्बेसेडर'; फडणवीस स्टेजवर असताना सरकारबद्दल म्हणाला...
टीम तालुका न्यूज  / 30-May-2023
https://taluka.news/upload/Jaynat_Patil_NCP.jpg
जयंत पाटील चौकशीसाठी ईडीच्या समोर; नेमकं प्रकरण काय?
टीम तालुका न्यूज  / 22-May-2023
https://taluka.news/upload/Mobile_phon.png
चोरीला गेलेला मोबाईल लगेच सापडणार, सरकार आणतेय नवी ट्रॅकिंग सिस्टीम
टीम तालुका न्यूज  / 15-May-2023
https://taluka.news/upload/download-1.jpg
कर्नाटकात काँग्रेसला "जनादेश" भाजपकडून दक्षिणेतील एकमेव राज्यातीलही सत्ता गेली
टीम तालुका न्यूज  / 13-May-2023
https://taluka.news/upload/Shahajibapu_Patil.png
"राऊतांना गुवाहाटीच्या झाडीत नेऊन टाका, तरचं..." शहाजीबापूंचा उपरोधिक सल्ला
टीम तालुका न्यूज  / 12-May-2023
https://taluka.news/upload/eknath_shinde.jpg
विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला चपराक, न्यायालयाच्या निकालावर एकनाथ शिंदे म्हणतात...
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/Devendra_Fadnvis_eknath_shinde.jpg
तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती? सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/weather_update.jpg
पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ, राज्यावर काय परिणाम होणार?
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/shahajibapu_patil.jpg
"ज्याचं मीठ खायचं त्याच्याशी गद्दारीची शहाजी बापूंची परंपरा..." नाना पटोलेंच्या टीकेवर काँग्रेसकडून उत्तर
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/maharashtra_police.jpg
सोलापुरात सराईत गुन्हेगाराला अटक, 15 दुचाकी, 10 मोबाईल जप्त 
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023

संबंधित पोस्ट