उद्योगपती आनंद महिंद्रा बिल गेट्सचे वर्गमित्र राहिले आहेत

देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारे आनंद महिंद्रांचा आहे आज वाढदिवस

उद्योगपती आनंद महिंद्रा बिल गेट्सचे वर्गमित्र राहिले आहेत
टीम तालुका न्यूज  / 01-May-2023

देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारे आनंद महिंद्रांचा आहे आज वाढदिवस आहे. आनंद महिंद्रा यांचा जन्म 1 मे 1955 रोजी झाला होता. त्यांनी महिंद्रा समूहाला खूप उंचीवर नेले असून समूहाने ऑटोमोबाईल्स आणि शेतीपासून ते आयटी आणि एरोस्पेसपर्यंतच्या 22 प्रमुख औद्योगिक क्षेत्रांमध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार केला आहे. 

 

आनंद महिंद्रांचा जन्म 1 मे 1955 रोजी मुंबईत महाराष्ट्रातील एका सुप्रसिद्ध व्यापारी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हरीश महिंद्रा आणि आईचे नाव इंदिरा महिंद्रा होते. तर आनंद यांचे हार्वर्ड विद्यापीठ आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये शिकले आहेत. तर आनंद महिंद्रा हे ऑटो विश्वातील एक मोठे नाव आहे. जे देशातील आणि जगातील बड्या उद्योगपतींमध्ये आदराने घेतलं जातं. तर ते आपल्या आजोबांनी सुरू केलेली महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी (Mahindra & Mahindra Company) चालवतात.

 

 आनंद महिंद्रा यांचे शालेय शिक्षण लॉरेन्स स्कूलमधून झाले. ते हार्वर्ड विद्यापीठ आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात फिल्म मेकिंग आणि आर्किटेक्चरचा अभ्यास केला आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए पूर्ण केले.

 त्यांचे आजोबा जगदीश चंद्र आणि कैलाश चंद्र यांनी पंजाबमधील लुधियाना येथे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा पाया घातला होता. जो आज आनंद महिंद्रा वारसा म्हणून पुढे नेत आहे. आनंद हे त्यांच्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील सदस्य आहेत जे ही कंपनी चालवत आहेत. आज, महिंद्रा ट्रॅक्टर, महिंद्रा बोलेरो, महिंद्रा एक्सयूव्ही, महिंद्रा स्कॉर्पिओ सारखी अनेक यशस्वी वाहने कंपनीच्या युनिटमध्ये बनविली जातात.

  आनंद महिंद्रा हे एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांचे वर्गमित्रही राहिले आहेत. आनंद महिंद्रा यांचे वडील हरीश महिंद्रा एक उद्योगपती होते आणि त्यांची आई इंदिरा महिंद्रा गृहिणी होत्या. आनंद महिंद्रा यांना अनुजा शर्मा आणि राधिका नाथ अशी दोन भावंडे आहेत. आनंदच्या पत्नीचे नाव अनुराधा महिंद्रा असून त्या पत्रकार आहेत.

 आनंद महिंद्रा यांनी महिंद्रा यूजीन स्टील कंपनी लिमिटेड (MUSCO) सह वित्त संचालकांचे कार्यकारी सहाय्यक म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि काही वर्षांनी MUSCO चे अध्यक्ष आणि उपव्यवस्थापकीय संचालक बनले.

फोर्ब्सनुसार आनंद महिंद्रा यांची सध्याची संपत्ती 17,166 कोटी रुपये आहे. आनंद महिंद्रा हे 19 अब्ज डॉलरच्या महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आहेत.2013 साठी त्यांना फोर्ब्स इंडियाचे ‘उद्योजक ऑफ द इयर’ म्हणूनही पुरस्कार दिला आहे. तर त्यांना जानेवारी 2020 मध्ये भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. तर उल्लेखनीय म्हणजे, त्यांनी भारतीय स्टार्टअप्समध्येही गुंतवणूक केली आहे. 

 

 

 


लोकप्रिय पोस्ट

https://taluka.news/upload/Add_a_heading.jpg
Video : सचिन राज्याचा 'स्माइल ॲम्बेसेडर'; फडणवीस स्टेजवर असताना सरकारबद्दल म्हणाला...
टीम तालुका न्यूज  / 30-May-2023
https://taluka.news/upload/Jaynat_Patil_NCP.jpg
जयंत पाटील चौकशीसाठी ईडीच्या समोर; नेमकं प्रकरण काय?
टीम तालुका न्यूज  / 22-May-2023
https://taluka.news/upload/Mobile_phon.png
चोरीला गेलेला मोबाईल लगेच सापडणार, सरकार आणतेय नवी ट्रॅकिंग सिस्टीम
टीम तालुका न्यूज  / 15-May-2023
https://taluka.news/upload/download-1.jpg
कर्नाटकात काँग्रेसला "जनादेश" भाजपकडून दक्षिणेतील एकमेव राज्यातीलही सत्ता गेली
टीम तालुका न्यूज  / 13-May-2023
https://taluka.news/upload/Shahajibapu_Patil.png
"राऊतांना गुवाहाटीच्या झाडीत नेऊन टाका, तरचं..." शहाजीबापूंचा उपरोधिक सल्ला
टीम तालुका न्यूज  / 12-May-2023
https://taluka.news/upload/eknath_shinde.jpg
विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला चपराक, न्यायालयाच्या निकालावर एकनाथ शिंदे म्हणतात...
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/Devendra_Fadnvis_eknath_shinde.jpg
तेव्हा तुमची नैतिकता कुठे गेली होती? सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न
टीम तालुका न्यूज  / 11-May-2023
https://taluka.news/upload/weather_update.jpg
पश्चिम बंगालमध्ये चक्रीवादळ, राज्यावर काय परिणाम होणार?
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/shahajibapu_patil.jpg
"ज्याचं मीठ खायचं त्याच्याशी गद्दारीची शहाजी बापूंची परंपरा..." नाना पटोलेंच्या टीकेवर काँग्रेसकडून उत्तर
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023
https://taluka.news/upload/maharashtra_police.jpg
सोलापुरात सराईत गुन्हेगाराला अटक, 15 दुचाकी, 10 मोबाईल जप्त 
टीम तालुका न्यूज  / 09-May-2023

संबंधित पोस्ट